Archive for the ‘If Then’ Category

मी झुरळ झालो तेव्हा..!!

April 12, 2008

मागच्या आठ्वड्यात अचानक घरची विज गेली.

सांयकाळ्चे जेमतेम ८ वाजले होते.

पोटात कावळे ओरडत होते, रविवार असल्यामुळे
मेसच्या ड्ब्बाला सुद्धा सुटी होती..
एकटं बाहेर जाउन होटेल मध्य़े खायचा कंटाळा आला होता.

अश्या वेळेस आधार असतो तो २-मिनीट maggy चा…
अजुन पर्यन्त हि २ मिनिटात कशि बनते मला कळले नाही..!!
असो..ते TV channel वाल्यांनाच माहिती…..ते त्यांच secret आहे.
बनव्यायला १० मिनिटे आणि ख्यायला २ मिनिटे..!!!
तर मी मोबाइल torch चा आधार घेत maggy बनवायला घेतली….
जेमेतेम १ मिनिट झाला असेल, मोबाइल battery ने दगा दिला.
दोन दिवसापासुन चार्ज केलेला नव्हता.
मेणबत्ती सापडेल तर शप्पथ. सगळी कडे काळाकुट्ट अंधार.
अंधारात चाचपडत कढई आणि maggy pocket मिळवले
आणि कसाबसा शेगडी पेटविण्यात यशस्वी झालो.
माझ्या ध्यानीमनी नसतांना पाल (wall lizard)
कढईतील पाणी गरम होइपर्यत पोहन्याचे धडे गिरवत होती.
याचे ब्रम्हद्यान मला नंतर झाले जेव्हा पालीची शेपटी चि चव
माझ्या ओठाला झाली…..!!!!

अजुन सुद्धा बराच अंधार पसरलेला होता. किचन मधुन कसला
तरी आवाज येत होता. पायाला काही तरी चावल्यासारखे वाटले,
चुकिच्या वेळेला, चुकिच्या व्यक्तिला एका द्रुष्ट झुरळाने
चावण्यासाठी निवडले होते.
मला काही कळायच्या आतच त्या झुरुळ्याचे विष माझ्या रक्तात
मिसळले होते. पायाला काय चावले आहे,ते बघायसाठी मी खाली
वाकलॊ तर माझ्या डोक्यावर antenaa सारखं काही तरि हलत
असल्याच मला जाणवलं.आणि खाली बघतो तर काय……
मला ८ पाय….शिट…शिट……मी झुरळ बनलो होतो….!!!!!!
आता येनारा आवाज जरा स्पष्ट यायला लागला होता…
मी आवाजाच्या दिशेने वळण्याचा प्रयत्न केला पण एकाच वेळेस मान
आणि पुर्ण शरीर सांभाळने अशक्य होतं.
मी जरा त्रस्त झालो होतो…!!
“hey festo, lets go for the party. do you wanna lift”…..
एक झुरुळ उडत उडत काही तरी पुटपुटला….!!!
” झुरुळांची पार्टी ” माझं आच्शर्य जरा बुचकळ्यात पडंल.
चला जाउन बघुया….!!!
डोक्यात विचार आला….चला नविन T-shirt आणि jeans घालुया.
पण स्व:ताकडे बघीतल्यावर कळलं कि मी ब्राउन
कलरचा स्केलेटन पेहेराव केलेला आहे.
“हे मित्रा चल लवकर उशिर होत आहे.” तो दुसरा माझ्या जवळ आला…
” ऎ, काय रे नविन दिसतोस….या शहरात….” चल बिच वर पार्टी आहे….
आम्ही दोघांनी हवेत भरारी घेतली… उड्ण्यात मजा येत होती…
खाली मोठी जमीन दिसत होती…
किचन डोरमेट घनदाट हिरव जंगलासारखे दिसत होत,
भिंतीच्या कोपय्रात ठेवलेला झाडु कुतुबमिनार दिसत होता
आणि बेसिन मधल्या नळातुन झिरपनारे पाणी नायझिरया
च्या धबधब्यासारखे भासत होते.

व्वा, हे सौदर्य मला कधी जाणवलंच नाही.
लवकरच आम्ही venue ला पोहचलो. वॉव…
काय निर्सगरम्य स्थळ होतं…..
छानसा समुद्र किनारा, थंड्गार वारा….!!
मी आजुबाजुला चाहुल घेतली…

  अरे हा तर माझा रेफ़्रीजिरेटर आहे……
  आणि हे एवढं पाणि का साचलयं…!!!

  सर्व झुरळ मस्त dance करत होती…..
  भिंतिवर चडुन उड्या मारित होती…..
  .फ़्रिज मधुन काही द्राक्शे खाली पड्लेली होती…
  ती आम्हा झुरुळांसाठी रम , वोड्का आणि विस्की होती…..!!
  मी मस्त वोड्का पित डान्स करित होतो…..
  मला थोडी जरा जास्तच झाली होती…..

  अचानक विज आली आणि सर्व मंड्ळीची पळापळ सुरु झाली.
  मला जरा जास्त झाल्य़ाने मी तिथेच कुठेतरी पड्लो.

  सकाळी उठुन बघतो तर मी किचन मधे जमीनीवर पडुन आहे,
  आणि सर्व lights सुरु आहे. मला डोक जरा जड वाटत होतं.
  मी परत मनुष्य अवस्थेत आलो होतो.
  “नक्कीच स्वप्न असेल”…मि स्व:ताशीच पुट्पुट्लो…..!!
  खात्रि म्हनुन मी फ़्रीज खाली बघीतले…
  एक काळं द्राक्श पड्लेलं होतं….
  आणि एक झुरळ अजुन सुद्धा रम ची मजा घेत होता…..

  Advertisements