मायाजाल ची….भाषा

तुम्हाला मराठीतून कम्प्युटरवर लिहिता येतं , लिहिलेला मजकूर इतर कोणाला पाठवता येतो किंवा कोणीतरी पाठवलेला मजकूर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवर वाचता येतो , या प्रश्नंची उत्तरं आपल्यापैकी बरेच जण नकारार्थी देतील. कम्प्युटरचा जन्म होऊन जवळपास शतकभराचा काळ लोटला , भारतात कम्प्युटर येऊन दोनएक दशकं होत आली तरी आपण मराठीसाठी म्हणून एक निश्चित कीबोर्ड ठरवू शकलेलो नाही. हीच मराठी भाषेची खरीखुरी शोकांतिका आहे.
आज जे मराठीत सुरू आहे तेच इंग्रजी कीबोर्डबाबत होत नाही. जगाच्या पाठीवर कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये इंग्रजीचा कीबोर्ड एकच आहे. त्याला इंग्रजी कीबोर्ड असं म्हणतात. ही एकवाक्यता आणण्यासाठी इंग्रजी कम्प्युटर विकासकांनी दाखवलेला समजूतदारपणा आणि दूरदृष्टी आपल्यात अजूनही दिसत नाही. म्हणून आपल्याकडे प्रत्येक सॉफ्टवेअरचा कीबोर्ड वेगळा असतो. एवढंच नव्हे तर त्याचं एन्कोडिंग ही प्रत्येकात वेगळे असतं.

हे एन्कोडिंग काय प्रकार असते ते आपण आता समजून घेऊ यात. आपल्याला स्क्रिनवर लिहिलेला मजकूर दिसतो , तसा तो कम्प्युटरला समजत नाही. तो त्याचं रूपांतर तांत्रिक भाषेत करतो. मग ते आपल्याला पुन्हा पाहायचं असेल तर त्याचं पुन्हा आपल्याला समजेल अशा भाषेत रूपांतर करतो. या प्रक्रियेस एन्कोडिंग असं म्हणतात. पण मराठीत या एन्कोडिंग मध्येही साम्य नाही. त्यामुळे एका सॉफ्टवेअरमध्ये केलेला मजकूर दुसरीकडे वाचता येत नाही किंवा त्यात बदल करता येत नाही. इंग्रजीत हे एन्कोडिंग एकच असल्याने कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये तयार केलेला मजकूर अन्य सॉफ्टवेअरमध्ये तसाच पाहता येतो , बदलता येतो.

मराठी विकासकांनी मराठीतल्या कीबोर्डबाबत नसली तरी किमान एन्कोडिंग मध्ये एकवाक्यता आणलीच पाहिजे. तर आणि तरच कम्प्युटरवर मराठी भाषा वापरणं सोपं जाईल. व्यावसायिक स्पधेर्मुळे हे विकासक असं करत नसतील सरकारने त्यात हस्तक्षेप करायला हवा. सरकारने या व्यावसायिकांना एकत्र बोलावून अशा प्रकारची एकसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आजपर्यंत मराठीच्या कम्प्युटरवरच्या वापराबाबत सरकारने दाखवलेली उदासिनता आता तरी दूर केली नाही तर भाषाव्यवहाराच्या दृष्टीने आपण खूप मागे पडू.

मराठीतले फॉण्टचे प्रकार आणि त्यांचा आकार हा आणखी एक वादाचा विषय. कम्प्युटरवर मराठीचा वापर सुरू झाल्यापासून हा वाद अबाधित सुरू आहे. एकतर मराठीतले म्हणजे देवनागरीतले फॉण्ट हे अधिकाधिक गोलाईयुक्त आणि गुंतागुतीचे आहेत. ते विकसित करताता त्यांचा मेगाबाइटमधला आकार वाढतो. तसंच फॉण्टवरचे संस्कार (उदाहरणार्थ लहानमोठे , बोल्ड , अंडरलाइन करणे .) सहजगत्या होत नाही. या अशा अनेक कारणांमुळे बरेच निर्माते फॉण्टनिमिर्तीच्या या फंदात पडत नाही. त्यामुळे मराठीत चांगल्या फॉण्ट्सची कमतरता जाणवते.

जे फॉण्ट आहेत ते बऱ्याचशा ठिकाणी चालत नाहीत. उदाहरणार्थ फोटोशॉप , कोरल ड्रॉ अशा उपयोजित सॉफ्टवेअरमध्ये हे फॉण्ट चाललेच पाहिजेत. पण जसे इंग्रजी फॉण्ट चालतात तसे मराठी फॉण्ट या सॉफ्टवेअर्समध्ये चालत नाहीत. हे टाळून नवे फॉण्ट विकसित करणं आवश्यक आहे. मराठी कलाकारांनी मराठी भाषेसाठी आपले योगदान म्हणून नवे फॉण्ट घडवावेत. त्या त्या फॉण्टला त्या कलाकाराचं नाव देऊन त्यांना श्रेयही देता येईल. पण मराठीतलं हे फॉण्टदारिद्य लवकरात लवकर दूर व्हायला हवे.

या अशा अनेक प्रश्ानंवर युनिकोड हे उत्तर म्हणून पाहिलं जातंय. पण त्यासंदर्भातही अजून युनिफॉमिर्टी यायची आहे. जगभरातल्या भाषाप्रेमींनी एकत्र येऊन भाषाव्यवहारात सुसूत्रतता आणण्यासाठी केलेला हा एक अनोखा प्रयत्न आहे. युनिकोड ही अद्याप पायवाट असली तरी तो उद्याचा महामार्ग आहे. कसाही असला तरी हा रस्ता खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाच्या वाटेवरून भाषांच्या एकात्मतेकडे जातो. या वाटेवर आपली मराठीही समर्थपणे उभी आहे. जगभरातली तिची मुलं आपपल्या परीने इण्टरनेटवर युनिकोड वापरून तिला अधिकाधिक समर्थ करत आहेत. म्हणूनच जरी आज मराठी नेटभाषा नसली तरी ती उद्या निश्चितच होईल , यावर आपण साऱ्यांनी विश्वास ठेवायला हवा!

Advertisements

One Response to “मायाजाल ची….भाषा”

  1. mohini875 Says:

    खरच मराठीसाठी एकच किबोर्ड असला तर किती बरे होईल. आपल्या मराठी भाषेचा जगभर प्रसार करण्यासाठी आपल्याकडे काही सुचना असतील तर त्यांचाही आपल्या ब्लॉगवर नक्की समावेश करा.

    morpees.blogspot.com
    कविता उर्फ़ मोहिनी

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s


%d bloggers like this: