इण्टरनेट चॅटिंग

इण्टरनेट चॅटिंगला कंटाळलेली ‘जनरेशन नेक्स्ट’ची बोल्डतरुण सध्या मोबाइल चॅटिंगच्या रूम्समध्ये पार्टनर शोधू लागलीय.

पण या मोबाइल चॅटिंगमध्ये कुणी आपल्या पार्टनरला फोननंबर देत

असेल तर सावधान! तुमचा नंबर डेटिंगच्या शोधात असलेल्या

तरुणांना

विकला जाण्याचीही शक्यता आहे आणि मग पुढचा मन:स्ताप,

भीक नको पण कुत्रा आवर, या म्हणीची आठवण करून देईल.

यंग आणि टीनएजर ग्रुपला आकषिर्त करण्यासाठी सर्वच मोबाइल

कंपन्यांनी चॅटिंग सव्हिर्सचा पर्याय दिलाय. त्यासाठी खास चार

आकडी

नंबरची सोय केली आहे. या नंबरवर मेसेज पाठवायचा. आपल्या

कोणत्याही नावाने लॉग-इन व्हायचं आणि ट्वेंटी, थटीर्, टीन्स,

फ्रेंडशिप, रोमान्स या रूम्समध्ये सर्फिंग करीत आपल्याला हव्या

त्या एज ग्रुपचा पार्टनर शोधायचा. मग ASL पासून सुरुवात करीत

wht u do, wht u like, can v meet पर्यंत चढत्या भाजणीचे

प्रश्न रंगवायचे.

आपला पार्टनर सेफ आहे याची खात्री पटल्यानंतर चार आकडी

मेसेजिंगला बाय-बाय करीत मोबाइल नंबरची देवाणघेवाण करायची.

मग पुढील चॅट थेट मोबाइल टू मोबाइल असा रंगवायचा…

पण तरुण मुलींच्या मोबाइल नंबरसाठी काही टोळ्या या चॅटरूमवर

टपून बसल्या आहेत… पैसे घेऊन तरुणांना ‘बोल्ड’ तरुणींचे मोबाइल

नंबर विकणाऱ्यांच्या टोळ्या! तेव्हा ‘ऑल बेब्स, बी अलर्ट!’

फन अनलिमिटेड’ अशा जाहिराती देऊन तरुणांना मोहात

पाडणाऱ्याअनेक कंपन्या मायानगरीत दाखल झाल्या आहेत.

पैसे भरा आणि हॉट टॉककिंवा डेटिंगसाठी तरुणींचे नंबर मिळवा,

असा थेट व्यवहार त्या करताहेत.

या कंपन्यांचे एजंट तरुणींचे नंबर मिळवण्यासाठी

मोबाइल चॅटिंगवर लॉग-इन होतात.

मोबाइल चॅटिंगवर बोल्ड तरुणी किंवा महिला हेरायची.

विश्वास संपादन करून

मोबाइल नंबर मिळवायचा आणि मग तो कंपनीच्या

योजनेसाठी विकायचा,

असा व्यवहार सध्या तेजीत आहे. कमिशनच्या हव्यासापोटी

असे नंबर विकले जातात.

Advertisements

One Response to “इण्टरनेट चॅटिंग”

  1. maharanime20 Says:

    khup chhan.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s


%d bloggers like this: